राजापूर जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा; जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे रत्नागिरीला झोडपून काढले आहे. पावसाचा कहर सुरु आहे. राजापूरमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नदिनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूरमध्ये पुर आलाय. राजापूर बाजापरेठेत पाणी शिरले आहे. जवाहर चौक देखील पाण्याखाली गेलाय. तर बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये देखील पुराचं पाणी शिरले आहे.
राजापूरातील कोदवली नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीपात्रालगत असणारी छोटी दुकाने, व्यापारी गाळे पाण्याखाली गेले आहेत. राजापूर नगर परिषदेने देखील सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

Comments
Post a Comment