येळवण वसतिगृहात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल


येळवण येथील विद्यानिकेतन हायस्कूलमधील मुलींच्या वसतिगृहाच्या खोलीत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमोल अनंत मलुष्टे (रा. येळवण वरचीवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रेवती माधव कोळेकर (रा. पाचल, पेठवाडी) यांनी रायपाटण दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे. खिडकीचे लाकडी गज तोडून आत प्रवेश करून या वसतिगृहातील लाकडी कपाट उघडून सामानाची हलवाहलव करत चोरीचा प्रयत्न केला असल्याचे कोळेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Comments