आर.एस.एस.च्या माध्यमातून दहशतवाद चालवला जातो, मुस्लिम मुलांनी आधुनिक शिक्षण घ्यावे
मदरसा व त्यांना दिला जाणारा निधी बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. खरे तर मदरसांमध्ये मुस्लिम समाजातील गरिब मुले शिक्षणासाठी जातात. त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिले जाते. त्या ठिकाणी द्वेश भावना निर्माण होईल असे कोणतेही शिक्षण दिले जात नाही. मात्र खरे तर दहशतवाद आर.एस.एस.च्या माध्यमातून चालवला जातो. मुस्लिम समाजामध्ये कोणतेही दहशतवादी प्रशिक्षण दिले जात नाही.
मदरसे बंद करण्यापाठीमागे सरकारचे काही तरी कपट कारस्थान असल्याचा मला संशय येतो असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व माजी राज्यसभा खासदार हुसैन दलवाई यांनी केले आहे. मुस्लिमांनी आधुनिक शिक्षणाची कास धरली पाहिजे. यामाध्यमातून नोकर भरती प्रक्रियांमध्ये देखील त्यांनी सहभागी झाले पाहिजे असेही मत कॉंग्रेस नेते व माजी राज्यसभा खासदार हुसैन दलवाई यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Post a Comment