चिपळूणचे अपूर्व शारंगपाणी कर्नल पदावर विराजमान
चिपळूण येथील नेत्र शल्य विशारद कै. संजीव शारंगपाणी आणि डॉ. अंजली शारंगपाणी यांचे सुपुत्र श्री. अपूर्व शारंगपाणी हे भारतीय सैन्यात एक अधिकारी आहेत. नुकतीच त्यांना बढती मिळाली असून ते आता कर्नल पदावर विराजमान झाले आहेत. चिपळूणमध्येच त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले आहे. भारतीय सैन्यातून त्यांनी युनोच्या शांती सेनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेवा बजावली आहे. आजपर्यंतची अपूर्व यांची कामगिरी पाहता ते नक्की एअरमार्शल श्री. हेमंत भागवत यांच्यानंतर श्री. अपूर्व शारंगपाणी हे देखील भारतीय सैन्यात सर्वोच्चपदी विराजमान झालेले पाहायला मिळतील,असा विश्वास चिपळूणवासीयांना आहे.

Comments
Post a Comment