नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांची महाविकासआघाडी नगरसेवकांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच बदनामी तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती भाजपा नगरसेवक व चिपळूण शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी व भाजप नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर आरोप करत जिल्हाधिकार्यांकडे बबडतर्फ संदर्भात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजपा नगरसेवक व चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू यांनी महाविकास आघाडी नगरसेवकांविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच बडतर्फ संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे केलेला तक्रार अर्ज चुकीचा व अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी दिली. गेल्या २०-२५ पंचवीस वर्षात मागील सत्ताधार्यांना चिपळूण शहराचा विकास करता आला नाही. तर महिला नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी केवळ चार वर्षात चिपळूण शहराचा विकास साधण्यात यश मिळवले आहे.
यामुळेच विरोधकांच्यात पोटशूळ निर्माण झाला आहे. मात्र आम्ही चिपळूण शहराच्या विकासाला प्राधान्य देत आहोत, असे स्पष्ट केले. तसेच गेल्या काही वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मच्छी मटण मार्केट, भाजी मंडई, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येत्या वर्षभरातच पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत असतील अशी ग्वाही यावेळी दिली. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आमच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. मात्र, तत्पूर्वी
नगराध्यक्षांवरील कोणताही आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी करण्याबरोबरच मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे तशी तक्रार नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली असल्याची माहिती यावेळी आशिष खातू यांनी दिली. यामूळे आरोप-प्रत्यारोपाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Post a Comment