जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक आजाराबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम
गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त बाह्यरुग्ण विभागात रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कलकुटगी यांनी मार्गदर्शन केले. मानसिक आजाराबद्दल योग्य ते मार्गदर्शन करून नातेवाइकांचे प्रश्न समजून घेतले. तसेच रुग्णांचे अधिकार त्याचप्रमाणे रुग्णाला मिळणाऱ्या सुविधा, कुटुंबाचे समाजाचे सहकार्य तसेच त्याच्याविषयी दयाभाव बाळगणे याबाबत मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी नातेवाईक रुग्ण व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment