विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर रत्नागिरीत आले, पण शेतक-यांना काही नाही दिले!
विरोधी पक्ष नेहमी सत्ताधा-यांवर टीका करत असतो. भारतीय जनता पक्ष सध्या विरोधी बाकावर आहे. त्यामुळे भाजपाकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून केली जात आहे. मात्र उत्तर प्रतिउत्तर पहायची आता शेतक-यांची ईच्छा राहिलेली नाही. नुकतेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर रत्नागिरी जिल्हा दौ-यावर होते. त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील एक दोन गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
मात्र नुसती पाहणी करण्यात काहीही अर्थ नाही. विरोधी पक्षनेते एवढा मोठा दर्जा असलेल्या पदाधिका-याने शेतक-यांना काहितरी थेट आर्थिक मदत करणे अपेक्षित होते. कोकणात भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष नेते म्हणुन पंचनामे करण्यासाठी तलाठी, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी गावागावात जात आहेत का? शेतक-यांना वेळेवर सात बारा उतारा मिळतो आहे का?, नुकसानीचे प्रामाणिक सर्वेक्षण होते आहे का?, याचा आढावा घेणे व प्रत्यक्ष आढावा घेणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही दिसून आलेले नाही.
केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्यदिव्य सभा रत्नागिरी जिल्ह्यात झाली होती. मोदी लाटेवर अनेक निवडणुका पार पडल्या. परंतू ज्या अपेक्षेने शेतकरी मोदी सरकारकडे पाहत त्या अपेक्षांचा व शेतक-यांचा भ्रमनिरास झाला असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. शेतक-यांना पिक विमा मिळतो क़ा?, मच्छीमार व शेतकरी यांना शेतीसाठी कर्ज मिळते का?, बँका सहकार्य करतात का?, याबाबत माहीती जाणुन घेणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात असे काहिही घडताना दिसून येत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर कोकण दौ-यावर येऊन नेमके काय साध्य झाले हा प्रश्न जनता विचारत आहे.

Comments
Post a Comment