उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षेत अडथळा निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांना याचा अनुभव आला. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आक्रमक पवित्र घेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरु केली होती. कला शाखेच्या पेपर ला हा ऑनलाईन गोंधळ झाला होता.
या प्रकाराची गंभीर दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ विद्यापीठाच्या कुलगुरूंना आदेश दिले आहेत. परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यर्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. तशा सूचना विद्यपीठाला दिल्या आहेत. विदयार्थ्यांनी काळजी करू नये.सध्या श्री. सामंत हे क्वारंटाईन आहेत. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षत घेऊन त्यांनी तातडीने पावले उचलत विद्यर्थ्यांना दिलासा दिला आहे.

Comments
Post a Comment