पुस्तकांचं वैभव इतकीच होती कलामांची संपत्ती!
आपल्या विज्ञाननिष्ठ, प्रेरणादायी विचारांसाठी आणि असामन्य व्यक्तीमत्वासाठी प्रसिद्ध असलेले भारताचे अकरावे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम वर्षानुवर्षे लोकांच्या आठवणीत तसेच राहतील. आजही एपीजे अब्दुल कलाम अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. देशासाठी योगदान दिलेल्या कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भारतीयांच्या त्या पिढ्या आहेत ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेकदा कलामांच्या संपत्तीवरून चर्चा केल्या जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे खरंच कलामांकडे किती संपत्ती होती? चला तर मग जाणून घेऊया कलामांची संपत्ती कोणती आणि किती होती.
कलामांना ऐशोआरामात जगणं कधीही मान्य नव्हतं. ते आपल्या पुस्तकांचं वैभव आणि आपल्या पेन्शनच्या आधारावर जीवन जगत होते. त्यांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये चार पुस्तकं लिहिली. कलामांनी आयुष्यात केलेल्या त्यांच्या जमापुंजीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही वैयक्तिक भेटवस्तू स्वतःसोबत घेतली नाही. त्यांनी सर्व भेटवस्तू सरकारी खजिन्यामध्ये जमा केल्या होत्या. कलामांचे मीडिया अॅडवायझर एसएम खान यांनी सांगितले की, 'त्यांच्या क्वार्टरमध्ये साधा टीव्हीसुद्धा नव्हता. ते फक्त रेडिओ आणि वर्तमानपत्रातून बातम्या जाणून घेत असतं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा