राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना मानसिक उपचाराची आवश्यकता


महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मानसिक उपचाराची आवश्यकता आहे अशा शब्दात कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीकास्त्र केले आहे.महाराष्ट्रातील भाजप नेते राज्यातील मदरसे बंद करावेत अशी मागणी करित आहेत. खरे तर केंद्र सरकारची भूमिका मदरशांचे आधुनिकीकरण करण्याची मानसिकता आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते मदरसे बंद करण्याची मानसिकता दाखवतात. 

खरे तर मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. धार्मिक तेढ निर्माण करणारे शिक्षण दिले जात नाही. खरे तर मदरशांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. दर्जेदार शिक्षण पद्धती निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात मदरशांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी ती भाजपची भूमिका होती. मात्र राज्यातील भाजप नेते उठसुठ महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी रोज नवनवीन विषय शोधत आहेत. त्यांना मानसिक उपचाराची आवश्यकता आहे अशा शब्दात कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीकास्त्र केले आहे.

Comments