शिक्षणमंत्री मा. सौ. वर्षाताई गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आदेशामुळे पालकवर्गामध्ये चैतन्याचे वातावरण


शाळा प्रशासनाकडून फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सुरु असलेल्या तगादाबाबत शिक्षणमंत्री मा. सौ. वर्षाताई गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आदेशामुळे रत्नागिरीतील पालकवर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे... 

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांना जुन, जुलै, ऑगस्ट, स्प्टेंबर महिन्याची टर्म फी, ई-लर्निंग फी, मॅनेजमेंट ऍक्टिवीटी फी, ह्या फीबाबत शाळा सुरु नसतानाही शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांकडे तगादा करणाऱ्या सॅक्रेड हार्ट कान्व्हेंट स्कुल, उद्यमनगर, रत्नागिरी तसेच रत्नागिरीतील इतर शाळेवर लवकरच कारवाई होणार असे रत्नागिरी जिल्हा काग्रेसतर्फे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते श्री. अशोकराव जाधव यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी संबंधीत शाळेमध्ये कार्यालयातील अधिकारी पाठवून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते श्री. अशोकराव जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फक्त ट्युशन फी म्हणजे महिन्याची शिकवायची फी ति पण जुन, जुलै, ऑगस्ट, ची भरायची आहे  पुढील ट्युशन फी पुढील कालावधीत भरावी असे सांगितले आहे. 

परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लॉकडाऊनच्या आर्थिक अडचणीमुळे या तिन महिन्याचिसुध्दा फी भरायला काही अडचण असल्यास तसे त्या शाळा प्रशासनाला भेटुन सांगावे आणि त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याचा निकाल न देणे अथवा ऑनलाइन  शिक्षण बंद होणे असे होणार नाही तसे झाल्यास त्वरीत खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते श्री. अशोकराव जाधव यांनी सांगितले आहे. रत्नगिरी जिल्हा काँग्रेसच्या ह्या पाठपुराव्याला रत्नागिरीतिल समस्त पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Comments