'या' वयोगटातील रुग्णांसाठी आली कोरोना लस

 


यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीज (NIAID) आणि अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना यांच्या संशोधकांनी विकसित केलेल्या लशीच्या (Moderna Covid-19 vaccine) पहिल्या टप्प्यातील चाचणीत असे दिसून आले की, या लशीमुळे वृद्धांमधील प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर वाढली.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, mRNA-1273 या प्रयोगात सामील लोकांवर चांगला परिणाम दिसून आला. NIAID च्या संशोधकांच्या मते, वृद्ध व्यक्तींमध्ये कोव्हिड-19च्या गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो आणि ते लसीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

NIAID संशोधकांच्या मते, वृद्ध व्यक्तींसाठी लसीकरण करण्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. संशोधकांनी सांगितले की ही लस या वयोगटातील लोकांवर कसा परिणाम करते हे त्याच्या सुरक्षिततेचा आणि कार्यक्षमतेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

चाचणीचा पहिला टप्पा 16 मार्च 2020 रोजी सुरू झाला आणि नंतर वृद्धांची नोंदणी करण्यासाठी सुमारे एक महिन्याने वाढविण्यात आली. शास्त्रज्ञांनी सांगितले की या चाचणीअंतर्गत 40 निरोगी व्हॉलेंटिअर्सची नोंद झाली. यापैकी 20 लोकांचे वय 56 ते 70 होते. तर इतर 20 लोकांचे वय 71 किंवा त्याहून अधिक होते.

संशोधकांना असे आढळले की या वयोगटातील व्हॉलेंटिअर्सवर या लशीचे अधिक चांगले परिणाम दिसून आले. जरी काहींनी लसीनंतर ताप किंवा थकवा यांसारखे प्रतिकूल परिणाम नोंदवले आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांना लस दिली गेली त्यांच्यात प्रतिकारशक्ती चांगली दिसून आली.


Comments