नाणारच्या जमीन घोटाळ्यात शिवसेनेचेच पदाधिकारी, चौकशीमध्ये त्यांची नावे जाहिर झाली पाहिजेत
नाणार रिफायनरी येणार म्हणून शिवसेनेच्याच पदाधिका-यांनी त्या परिसरात घोटाळे करुन जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्व जमीन व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एका महिन्याच्या आत ही चौकशी करुन तो अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या प्रकणात शिवसेनेचेच पदाधिकारी आहेत व त्यांची नावे जाहिर होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.
निलेश राणे गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. निलेश राणे म्हणाले की जमीन घोटाळ्यात शिवसेनेच्याच पदाधिका-यांची नावे आहेत. आणि ती नावे मी स्वतः जाहिर केली आहेत. आता शासन चौकशी मध्ये ही नावे जाहिर करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व खरेदी व्यवहार स्थगित करण्यात यावेत. असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Comments
Post a Comment