राज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, अतिरिक्त शाखा यांना २० टक्के अनुदान देणे तसेच २० टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के आणि याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ एकूण ४३ हजार ११२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Comments
Post a Comment