रत्नागिरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपद पुन्हा सुदेश मयेकर यांना मिळणार? राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा


रत्नागिरी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्षपद पुन्हा एकदा सुदेश मयेकर यांना मिळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सुदेश मयेकर रत्नागिरी नगर परिषदेत गटनेते आहेत. शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नियमानुसार सुदेश मयेकर यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजिनामा दिला होता. 

त्यानंतर नाना मयेकर यांना तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नुकतेच नाना मयेकर यांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. सुदेश मयेकर यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांशी जोरदार टक्कर दिली होती. त्यांनी कार्यकर्त्यांची चांगली बांधणी केली होती. आता पुन्हा एकदा प्रदेश स्तरावरुन सुदेश मयेकर यांना तालुकाध्यक्ष पद द्यावे याबाबत विचारविनिमय सुरु आहेत.

Comments