प्रशासनाला सहकार्य करून ईदे मिलाद घरच्या घरी साजरी करा:-उदय झावरे
आज मोठया उत्साहात साजरी होणारी ईदे मिलादुन्न नबीचा सण साजरा करताना प्रशासनाला सहकार्य करून घरच्या घरी कोव्हील्ड 19च्या पार्श्र्वभूमी वर सुरक्षित राहून साजरा करण्याचे आहवन संगमेश्वर पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी तालुका वासीयांना केले आहे. ईदे मिलादच्या निमित्ताने तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या लोकांना मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.
शासनाने ईद -ए-मिलादचे जे मार्गदर्शन सूची जाहीर केले असून त्या निकषावर साजरी करणे गरजेचे आहे. सध्या कोव्हील्ड 19 च्या अनुषंगाने जबाबदारीने वागणे गरजे आहे असे मत यावेळी त्यानी व्यक्त केले.मुस्लिम समाजातील जमलेल्या लोकांकडून आपुलकीने ईद मिलाद नबी च्या बद्दल माहिती जाणून घेतली.समाजात एकोपा राखून राहावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष जमूतर अलजी,नासिर मापारी,अफसर खान, मुनीर खान,तैमूर अलजी आदी सह प्रमुख लोक उपस्थित होते. सोशल डिस्टन पाळू ही सभा घेण्यात आली.

Comments
Post a Comment