कोंडीवरमधील पळून गेलेला अल्पवयीन मुलगा मुफीद बोरकर अखेर सापडला
मोबाईल वर खेळू नको अशी आई बोलल्यामुळे कोंडीवरे ता.संगमेश्वर येथून 17 वर्षी तरूण घरातून पळून गेल्याची घटना घडली होती .याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात त्याचे वडील अलफरीद सुलेमान बोरकर यांनी खबर दिली.याबाबत अधिक माहिती नुसार मुफीद अलफरीद बोरकर हा दुपारच्या वेळी मोबाईल वर खेळत होता त्याला त्याची आई मोबाईलवर खेळू नको अशी बोलली.या रागातून मुफीद बोरकर हा आपल्या वडीलांची मोटारसायकल(क्र एम एच 06/ बीएच 1030) घेऊन कोणाला न सांगता पळून गेला होता.
मुफीद घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सर्व नातवाईकांकडे शोध घेतला मात्र त्याचा पत्ता लागला नव्हतो अखेर तो खेड जवळ सापडला.अल्पवयीन मुलगा मुफीद बोरकर याला माखजन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हे.कॉ. शिंदे आणि पो.कॉ. मोंडे यांनी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तासात खेड जवळून शोधून काढले त्यामुळे संगमेश्वर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment