कोकणातील शेतक-यांना स्वतंत्र पॅकेज देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडणार


मागिल तीन दिवसांपासून राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार कोकण दौऱ्यावर आलेले आहेत. शनिवारी रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी की त्यांनी संवाद साधला.

त्यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीक्षेत्र हे लहान लहान असते. त्यामुळे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने मध्ये शेती क्षेत्र वेगळ्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. त्याचप्रमाणे कोकणात मूळ मालक व कसणारा शेतकरी अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या नागपूर अधिवेशनात या विषयाच्या अनुषंगाने देखील प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

Comments