मोठा दिलासा! देशात फेब्रुवारीपर्यंत राहणार कोरोनाचे केवळ ४० हजार रुग्ण

 


केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील अनेक वैज्ञानिकांच्या मदतीने भविष्यातील कोरोना महारोगराई संबंधित एक आकलन मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलनुसार भविष्यात कोरोनास्थिती संबधी अनुमान लावण्यात आले आहेत. यानुसार फेब्रुवारी-2021 पर्यंत देशातील कोरोनारुग्ण संख्येत कमालीची घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार देशात या काळात केवळ 40 हजार सक्रिय कोरोना बाधित राहतील, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

कोरोना लसीसंबंधी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाकरिता कर्मचारी तसेच इतर लॉजिस्टिक व्यवस्थेला राज्य तसेच केंद्र सरकारकडून प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. 
रविवारी 'रविवार संवाद' कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्र्यांनी देशातील काही राज्यात कोरोनाचा सामूहिक फैलाव झाला असल्याची कबुली दिली होती, हे विशेष.

कोरोनाची दुसरी लाट येणार

हिवाळ्यात देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी देखील या शक्यतेला दुजोरा दिला आहे. परंतू, नागरिकांनी पूर्वी प्रमाणेच सर्व नियमांचे पालन केले तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


 

Comments