रत्नागिरीत विनामूल्य कान, नाक, घसा तपासणी शिबिर उत्साहात संपन्न


रत्नागिरीतील जमियत उलेमा-ए-हिंद व यशश्री ई.एन.टी. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कान, नाक घसा तपासणी शिबिराचे उद्यमनगर येथील मेमन समाज हॉल येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये कानाची शस्त्रक्रिया, घोरणे, चक्कर येणे, नाकशी संबंधित शस्त्रक्रिया, थायरॉईड, नाकाची संदर्य शस्त्रक्रिया, नाक व सायनस अॅलर्जी, श्रवणयंत्र, लेझर शस्त्रक्रिया आदी सुविधांचा लाभ देण्यात आला.  

या कार्यक्रमावेळी मौलाना एजाज पन्हळेकर, डॉ सुधिर कदम, डॉ गीता कदम, जुबेर नाकाडे, मन्सुर काझी, इमरान सय्यद, शौकत काझी, प्रफुल्ल लान्जेकर, मुफ्ती तौफिक सारंग, हारिस शेकासन, सुहेल मुकादम, आरिफ मेमन आदी उपस्थीत होते.

Comments