विद्यापीठाची बेपर्वाई, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना आज अंतिम वर्ष कला शाखेचे पेपर उपलब्ध झाले नाहीत


आज मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणारी  प्रश्नपत्रिका दु.२.०० वाजून गेले तरी प्राप्त झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी गोंधळले. उपलब्ध मोबाईल क्रमांकावर संपर्क होत नसल्याचा अनुभव आल्याने विद्यार्थी हवालदिल झाले. दु. २.०० ते ३.०० ही परीक्षेची वेळ असताना ३.०० वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत.

हा विद्यापीठाचा अत्यंत बेपर्वाइ कारभार आहे. उच्चशिक्षण मंत्री महोदयांच्या विधानसभा क्षेत्रात अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका प्राप्त न होणे ही बाब दुर्दैवी आहे. विद्यापीठाने तात्काळ निर्णय करत आज ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत त्यांच्यासाठी परत परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांचे नुकसान तांत्रिक कारणामुळे होता नये अगर कोणाच्या बेपर्वाईचा फटका विद्यार्थ्यांना बसता कामा नये याची योग्य ती काळजी विद्यापीठ यंत्रणेने घ्यावी. मुलांच्या मनातील व्दीधा अवस्था संपवण्यासाठी विद्यापीठाने तात्काळ याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून फेरपरीक्षा घेण्याचे घोषित करावे अशी मागणी अॅड. दीपक पटवर्धन भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.

Comments