लोटे एमआयडीसीतील एका कंपनीत सुरक्षा साधने न पुरवता घातक रसायनामध्ये काम करायला लावल्याने कामगाराचा मृत्यू

 


लोटे एमआयडीसीमधील डॉ.खान इंडस्ट्रीअल कन्सल्टन्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगाराला कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता अत्यंत घातक अशा रसायनामध्ये हयगयीने व निष्काळजीपणाने त्याच्याकडून काम करवून घेतल्यामुळे त्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. किरण शहाजी येल्लाळ असे त्या मृत्युमुखी झालेल्या कामगाराचे नाव आहे. या घटनेची फिर्याद खेड पोलिस उपनिरिक्षक सोमनाथ जयवंत कदम यांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी मोहमद अब्दुल गफार खान, विखार अहमद गफार खान, फजलुनिसा बेगम गफार खान, सलीम अब्दुलवासे विजापुरे, साजीद नजिर देशमुख, मुदस्सर अब्दुल रहिम पटेल सर्व राहणार लोटे, ता.खेड यांच्यावर मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी खेड पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर १८३/२०२०, भा.द.वि.कलम ३०४(अ), ३३७, ३३८, २८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Comments