राष्ट्रवादी शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेस कडुन नवनिर्वाचित जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा गावडे-फुले यांची भेट आणि स्वागत
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे जिल्हाशल्य चिकीत्सक म्हणुन पुनर्नियुक्ती मिळालेल्या सौं संगमित्रा फुले यांचे स्वागत नुकतेच राष्ट्रवादी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडुन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाला जे जे काही लागेल ती मदत करण्याचे अभिवचन या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन देण्यात आले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू , राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मंदार नैकर, पप्पु तोडणकर, रुपेश आडीवरेकर , मिलिंद माळवदे सूरज शेट्ये, साईजीत शीवलकर, आनंद नाखरेकर, अजय माने आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

Comments
Post a Comment