सत्ताधारी शिवसेना शेताच्या बांधावर जाऊन काय भारे बांधणार?

 


विरोधी पक्ष नेते बांधावर जाऊन शेतक-यांचे सांत्वन करतात, त्यांना धिर देतात हे योग्यच आहे. कारण ते मदत जाहिर करु शकत नाहीत. परंतु सत्ताधारी शेतीच्या बांधावर जाऊन काय भारे बांधणार? अशी खळबळजनक टीका सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भाजप नेते व माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेनेवर केली आहे. प्रशासन पंचनामे करणारचं आहे. परंतु त्या पंचनाम्या नंतर हेक्टरी शेती पीकाला व फळबागांना किती रक्कम भरपाई म्हणुन मिळणार हे सांगायला मुख्यमंत्र्यांसह सत्तेतील आमदार ,खासदार ,मंत्री का तयार होत नाहित.

शेतक-यांच्या बांधावर जाण्या  पेक्षा मुख्यमंत्री महोदयांच्या घरात किंवा सचिवाच्या मंत्रालयात बसुन सरकारचा जमा खर्चा चा ताळेबंद तपासुन , अनावश्यक खर्च वगळून , कोव्हिड काळात जसे प्रत्येक विभागाचे , जिल्हयाचे बजेट कमी केले तसे कमी करुन या जनतेचा पोशिंदाच उपाशी राहु नये म्हणुन ताबडतोब २५०००/- शेतीसाठी व ५०००० /- फळबागांसाठी मदत जाहीर करा. अशी मागणी भाजपचे नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

Comments