अवैद्य धंद्याच्या धाडीनंतर पुन्हा धंदे तेजीस मात्र हप्ते वाढले

 


रत्नागिरीचे नवीन पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी आपला पदभार स्वीकारल्या नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यावर कारवाई सत्र सुरु झाले. अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या मात्र त्या धाडी दाखवन्या पुरत्याच होत्या कि काय असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय.धाडी पडल्या, गुन्हे दाखल झाले मात्र दारू, मटका, जुगार रत्नागिरी सह अनेक तालुक्यात ठीक ठिकाणी जोरदार सुरु आहे.केलेल्या कारवाई नंतर हे धंदे थांबले पाहिजे होते मात्र या उलट जोरदार धंदे सुरु झाले आणि हप्ता वसुलीची अमाऊंट वाढल्याची चर्चा आता अवैध धंदे वाले करू लागलेत. 

रत्नागिरी मध्ये नवीन पोलीस अधीक्षक आल्यावर अवैध धंद्यावर सुरवातिला कारवाई करतात आणि मग ते धंदे पुन्हा कार्यरत असतात हे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठी नवीन नाही.जे जे पोलिस अधीक्षक येऊन गेले त्यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अगोदर अवैध धंद्यावर कारवाई केली. एक वेळ तर अशी आली होती कि रत्नागिरी जिल्हा अवैध धंदे मुक्त होणार. पण ते नंतर लक्षात आले कि ती फक्त स्टाईल होती मात्र अंदर से सब शुरु था. अशीच वेळ पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केलेल्या कारवाई वर होऊ नये असे ही सांगितले जात आहे. 

पोलीस अधीक्षक प्रत्येक्षात जाऊन लोकांमध्ये मिसळून माहिती घेतली तर पोलिसांना या विषयात अनेक लोक मदत करतील असेल मात्र आदेश देऊन कारवाई होतात पण पुढे धंदे बंद होण्या ऐवजी त्या धंद्याचे हप्ते वाढवून जोरदार धंदे सुरु आहेत. ज्या ठिकाणी धाडी पडल्या आणि ज्या ठिकाणी पडायच्या आहेत तेथील सुजाण आणि अवैध दारू धंदे विरोधात असणाऱ्या लोकांना थेट भेटून नेमके त्या त्या भागात काय चालाय ही माहिती घेण्याचे आहवन पोलिस अधीक्षकांना केले जातेय. 

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी धरून 9 ही तालुक्यामध्ये दारू, जुगार, मटका नेमके कोणाच्या आशीर्वादाणे सुरु आहेत.?  यांना कोण पाठीशी घालतंय? याचा पाठीराखा कोण?  पोलिस अधीक्षकांच्या नावे कोण हप्ते जमा करू लागलेत?  या सर्व गोष्टीची चोकशी करा. चोर पडेल असेल सुजाण नागरिक मागणी करत आहेत.

Comments