उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी - अनु.जाती.विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची मागणी

 


उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असून या घटनेचा  रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अनु.जाती.विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिरुध्द कांबळे यांनी जाहीर निषेध व्यक्त करुन सदर प्रकरण फास्टट्रँक कोर्टात चालवण्यात यावा. आणी आरोपींवर कडक कारवाई करून दलित महिलांवरील अत्याचार रोखण्यात  अपयशी ठरलेल्या उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर झालेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करुन पिडीत कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास रत्नागिरी जिल्हा पेटून उठेल असा ईशारा काँग्रेसचे अनु. जाती.विभागाचे तालुकाध्यक्ष श्री.उदय पवार यांनी दिला आहे.

Comments