राजस्थान रॉयल्सही कर्णधार बदलणार
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात ऑस्ट्रेलियन स्टार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघाला अपयश आले आहे. ८ सामन्यांत ३ विजयांसह ६ गुणांची कमाई करताना RR गुणतक्त्यात सातव्या स्थानी आहे. त्यांनी काही सामने तर हातचे घालवले आणि त्यामुळेच Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता सर्व सामने जिंकावे लागतील. अशात RRनं शुक्रवारी केलेल्या एका ट्विटनं नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
योगायोग असा की कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) कर्णधार दिनेश कार्तिकनंही नेतृत्वाची जबाबदारी आजच सोडली आणि इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याच्याकडे सोपवली. त्यामुळे RRच्या आजच्या ट्विटनं स्मिथकडून नेतृत्व जोस बटलरकडे जाण्याची चर्चा सुरू झाली. स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थाननं सलग दोन विजयासह IPL 2020 सुरुवात केली, परंतु त्यांची गाडी नंतर घसरली. शुक्रवारी समालोचक हर्षा भोगले याच्या ट्विटनंही चाहत्यांच्या भूवया उंचावल्या.

Comments
Post a Comment