सर्प, विंचू दंशाच्या रुग्णांनी जायचे कुठे?


चिपळूण तालुक्यात भात कापणीचा हंगाम सुरू आहे. या हंगामात विंचू व सर्प दंशाचे प्रमाण अधिक असते. वेळेत उपचार झाले नाहीत तर रूग्ण दगावण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कामथे उपजिल्हा रूग्णालयात विंचू व सर्प दंशवरील लस उपलब्ध करून ठेवली जाते. सध्यस्थितीत कामथे रूग्णालयात केवळ कोविड रूग्णांवर उपचार केले जात आहेत. 

प्रशासनाने कामथे रूग्णालयातील ओपीडी चिपळूण शहरातील वालावलकर हॉस्पिटलच्या सेंटरमध्ये सुरू केली आहे. मात्र या ओपीडीची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कापसाळ व धामणवणे येथील दोन लहान मुलांना विंचू दंशावरच्या उपचारासाठी कामथे उपजिल्हा रूग्णालयासह चार हॉस्पिटलचे दरवाजे ठोठवावे लागले होते. ही बाब फारच गंभीर असल्याचे मत माजी सभापती श्री. शौकत मुकादम यांनी व्यक्त केले आहे.

Comments