घाटीवळे येथे हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर कारवाई
संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमाला साखरपा पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. भराडीन मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाशेजारी साखरपा पोलिसांचा पहारा सुरू होता. याचवेळी झुडुपांशेजारी अशोक तुकाराम कांबळे (५५) नामक व्यक्ती हातभट्टी दारू प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधन विकताना निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने तिथे धाड टाकत त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलिस फौजदार संजय उकार्डे, कॉ. यादव, देसाई, नागवेकर यांनी केली.

Comments
Post a Comment