तुम्हीही सरसकट Antibiotics घेताय सावधान! दुर्मिळ, गंभीर संसर्गाला निमंत्रण देताय
पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये एक 65 वर्षीय व्यक्ती उपचारांसाठी आले होते. त्यांना चालण्यास समस्या, श्वास घेण्यास अडचण, अवयव निकामी तसेच ब्लड पॉयसनिंगच्या तक्रारी उद्भवल्या होत्या. या सर्व तक्रारी त्यांना जाणवत होत्या कारण त्यांच्या शरीराला मल्टी ड्रग रेसिस्टंट बॅक्टेरिया (अनेक औषधांना दाद न घेणारा विषाणू) संसर्ग झाला होता.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना हा संसर्ग सरसकट सतत अँटीबायोटीक्स औधषं घेण्याच्या सवयीमुळे झाला आहे. हा संसर्ग अनेक अँटीबायोटीक्सना दाद देत नाही.
आता, ज्या व्यक्ती या संसर्गबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील या संसर्गाची लागण होते. शिवाय त्यांनाही अँटीबायोटीक्स दाद देत नाहीत.रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी Methicillin-Resistant Staphylococcus Aureus (MRSA) या संसर्गाचे निदान केले. हे फार दुर्मिळ प्रकरण होते. या व्यक्तीने एकतर यापूर्वी सरकरट अँटीबायोटीक्सचे सेवन केले असेल. किंवा हा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याची लागण झाली असेल.
मेहबूब जमादार, मिरजमध्ये राहणारे निवृत्त रहिवासी सांगतात, “मला आता दिलासा मिळाला आहे की, मी आता निरोगी आयुष्य जगण्यास सक्षम आहे. पण दोन महिन्यांपूर्वी जेव्हा मी रुबी हॉल क्लिनिकमध्ये आलो होतो तेव्हा मला खात्री नव्हती की मी माझ्या पायावर उभे राहू शकेन, किंवा मी बोलू शकेन की नाही. कदाचित मी जगू की नाही याची मला खात्री नव्हती.”रूबी हॉल क्लिनिकच्या क्रिटीकल केअर मेडीसीन विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांच्या सांगण्यानुसार, “रूग्ण रुग्णालयात आला त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर होती. चालणे अशक्य होते, त्याचे अवयव कार्यरत नव्हते, त्याला योग्यपद्धतीने श्वास घेता येत नव्हता, त्याचे हिमोग्लोबिन 3 इतका कमी झाले होते. शिवाय त्याचा रक्तदाब कमी होता आणि त्याच्या रक्त सेप्टिक होते. सेप्टीमिया ज्याला ब्लड पॉयसनिंग म्हणून पण ओळखले जाते. ज्यावेळी शरीरात बॅक्टेरियाचा संसर्ग असतो त्यावेळी सेप्टीमिया होतो. या प्रकरणात, आम्हाला संसर्ग नेमका कसा झाला हे शोधावे लागले. आम्हाला आढळले की संसर्ग युरोलॉजिकल सिस्टममधून येत आहे. त्यानंतर आम्ही ऑपरेशन करून संक्रमण काढून टाकले.
त्या पुढे म्हणाल्या, परंतु आम्हाला हा संसर्ग कोणत्या विषाणूंपासून सुरू झाला हे शोधायचे होते. त्यासाठी केलेल्या तपासणीने आमच्या सर्वांना आश्चर्यचकीत केले. कारण हा एक विषाणू होता MRSA ज्यामुळे हा दुर्मिळ संसर्ग झाला. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात MRSA ची प्रकरणे फारच कमी आहेत. परंतु या प्रकरणातून असे दिसून आले की MRSAचा संसर्ग समुदायातून येऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे अँटीबायोटीक्सचा सरसकट वापर.डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, हा संसर्ग रूग्णालय अधिग्रहित आहे. MRSA संसर्ग सामान्यत: एखाद्या संक्रमित जखमेच्या संपर्कात किंवा संक्रमित हातांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांद्वारे पसरतो. पण या प्रकरणात हा संसर्ग समूदायातून किंवा सरसकट अँटीबायोटीक्सच्या सेवनाने झाला आहे.
डॉ. साठ्येंनी सांगितलं, या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी आम्ही त्यावर उपचार केले आहे. त्याच्या पाठीत पू जमा झाला होता तो काढून टाकण्यात आला आहे. हा संसर्ग काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. MRSA संसर्गाचे विषाणू नाकामध्ये देखील होते त्यामुळे त्यासाठीही रूग्णाला उपचार देण्यात आले.तो रूग्ण आता या संसर्गापासून मुक्त आहे. स्वॅब चाचणीचा निकाल नकारात्मक आहे. संसर्ग आहे की नाही हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. हा संसर्ग इतरांपर्यंत पसरू नये याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णाला नियमितपणे एक चाचणी घेण्याचा सल्ला दिला आहे. या चाचणीद्वारे, जर संसर्गाची पुन्हा होण्याची शक्यता तपासून समाजात पसरण्यावर नियंत्रण ठेवता येते.
मेहबूब म्हणाले, “अँटी-बायोटिक्सच्या सरसकट वापरामुळे माझे आयुष्य धोक्यात आले होते. मी आवाहन करतो की डॉक्टरांच्या सांगण्याशिवाय आम्ही कोणतीही अँटीबायोटिक्स घेऊ नये. मी आता माझे सर्व नित्यकर्म स्वत: हून करण्यास सक्षम आहे. मी सर्व वेदना पासून मुक्त आणि मी निरोगी आहे.”रूबी हॉल रूग्णालयाच्या अनेस्थेशिया डॉ. तनिमा बारोनिया म्हणाल्या, “या रूग्णाने अँटीबायेटीक्सचे सरसकट सेवन केले होते. जेव्हा एखादे MRSA संसर्ग आढळतो तेव्हा असे बरेच लोक असतात ज्यांना या धोका असू शकतो. याचे कारण असे आहे की रुग्णाला हा संसर्ग असतो आणि तो इतरांपर्यंत पसरवू शकतो. जेव्हा संसर्ग समुदायाकडून येतो तेव्हा आपण काळजी घेणे गरजेचे आहे.
सरसकट अँटीबायोटीक्सचा वापर करणे थांबवावे.”बी.जे. मेडिकल महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. अंजू कागल म्हणाल्या, “सरसकट अँटीबायोटीक्सचे सेवन करू नये. नागरिकांनी केमिस्टकडे जाऊन थेट अँटीबायोटीक्स विकत घेऊ नये. सरकटक अँटीबायोटीक्सच्या सेवनाने भारतात MRSA ची प्रकरणे वाढतील. या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, संसर्ग झालेल्यांनी सार्वजनिक जलतरण तलावात जाऊन नये किंवा टॉवेल्ससारख्या गोष्टी तरांना वापरण्यास देऊ नयेत.”रूबी हॉल क्लिनिकमधील डॉ. सचिन गांधी, डॉ. हिमेश गांधी, डॉ. स्वेता पट्टनाईक यांनी देखील रूग्णावर उपचार केले.

Comments
Post a Comment