नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीचा ओठ दाताने तोडला, औरंगाबादेतील संतापजनक घटना

 


हाथरस प्रकरणामुळे अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती. ही घटना ताजी असताना महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना औरंगाबाद  जिल्ह्यातील वडगाव इथं घडली आहे. एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. संजापजनक म्हणजे, या नराधमाने तिचा ओठ दाताने चावून तोडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी इथं गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 7 वर्षीय चिमुकली मिस्त्री काम करणाऱ्या आजी व मामाकडे आलेली होती. 

मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मुलीला आरोपीने घरातून अलगद पांघरुणासहीत उचलून नेले. त्यानंतर जवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.अत्याचार सुरू असताना या नराधमाने पीडित चिमुरडीचा ओठ दाताने चावून तोडला. यावेळी मुलगी जोरात ओरडल्याने शेजारील लोकं येतील या भीतीने आरोपीने तिथेच तिला सोडून धूम ठोकली. 

त्यानंतर आवाज झाल्यामुळे लोकांनी धाव घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला.स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतील मुलीला नातेवाईकांनी व शेजारील लोकांनी औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात रवाना केले. मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहे.

Comments