साखर झोपेत असताना 33 मजली इमारतीत अग्नितांडव
दक्षिण कोरियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ दक्षिण कोरियातील उलसन शहराचा आहे. या शहरात सकाळी एका 33 मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल 88 लोकं गंभीर जखमी झाले आहे. अजूनही आगीतून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.दक्षिण कोरियाच्या गृह आणि सुरक्षा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ही आग प्रचंड भीषण होती. या आगीत किमान जखमी झालेल्या 88 लोकांवर उपचार सुरू आहेत.अखेर आग आटोक्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टरनं पाण्याचा वर्षाव करावा लागला. याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान दक्षिण कोरिया सरकारनं जमखींचे उपचार मोफत करण्यात येत असल्याचे सांगितले.


Comments
Post a Comment