आईशी भांडण झाल्याचा राग मनात धरून 17 वर्षीय मुलाची आत्महत्या


शहरातील मार्कंडी येथे आईशी झालेल्या किरकोळ भांडणातून सतरा वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 19) उघडकीस आली. जहीर अन्वर शेख (रा. मार्कंडी, स्वामी मठशेजारी, चिपळूण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस ठाण्यात राजेश यशवंत शिंदे (रा. मार्कंडी, स्वामी मठशेजारी, चिपळूण) यांनी खबर दिली. राजेश शिंदे यांच्या घरालगतची खोली अनुप नावाच्या मुलाला भाड्याने दिली आहे. 

त्याचा मृत जहीर शेख हा मित्र असून तो नेहमी अनुपला खोलीवर भेटायला यायचा. मात्र सध्या अनुप हा गावी गेला असून खोलीची चावी त्याने जहीरला दिली होती. जहीरचे त्याच्या आईशी भांडण झाले आणि तो रविवारी रात्री घरातून रागाने निघून गेला होता. जहीर रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या आईने सकाळी शोधाशोध केली असता मित्राच्या खोलीमध्ये मुलगा जहीर फास लावलेल्या अवस्थेत आढळला. या बाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Comments