15 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमीत्त रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नागरीकांना 'हे' आवाहन


पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचे आरोग्य अबाधित राहणेसाठी संयुक्त राष्ट्र संघाने सूचित केलेनूसारआंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस दरवर्षी 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिकस्तरावर साजरा करण्यात येतो. लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी व विकासासाठी स्वच्छता आणि आरोग्यशास्त्र या दोन गोष्टी अत्यंत महत्वाचे आहेत. अस्वच्छतेमुळे दरवर्षी लाखो लोक अनेक आजाराना बळी पडत असतात. विशेष करुन मुलांमध्ये याचा प्रभाव जास्त दिसून येतो म्हणून मुलांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती माहिती शिक्षण व संवाद माध्यमातून मोठया प्रमाणात करणे आवश्यक आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने आपला हात हा एक महत्वाचा भाग आहे. आपण आपल्या हातानी अन्न सेवन करीत असतो म्हणून हाताची स्वच्छता महत्वाचे आहे. आपल्या हाताच्या स्वच्छतेवर आपल्या पोटाचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे नेहमी हाताची  स्वच्छता राखणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरील टाकणेत आलेला कचरा, उघड्यावरील विष्ठा इत्यादी घाणींमुळे त्यावरील जिवाणू, विषाणू, परोपजिवी यासारख्या अनेक घटकापासून अतिसार व इतर रोग होतात. मानवी विष्ठा ही अतिसाराचे प्रमुख कारण आहे. 

हात केव्हा धुवावे -

·       स्वयंपाकापुर्वी व जेवणाआधी.

·       शौचालयाला जाऊन आल्यावर.

·       लहान बाळाची शी धुतल्यावर.

·       पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर.

·       बाहेरुन फिरुन, खेळून आल्यानंतर.

·       दुसऱ्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यावर. 

हात धुण्यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पुष्कळ लोकांना हात कसे धुवावे हे माहित नसते. या बाबतच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 15ऑक्टोबर रोजी 'वर्ल्ड हँड वॉशिंग डे' साजरा केला जातो. हात कसे धुवावेत? तर, नळाच्या किंवा पाण्याच्या धारेखाली हात पाण्याने ओले करावेत. पाणी ओतणे बंद करून हात स्वच्छ घासावेत. त्यानंतर किमान 40 सेकंद साबण अथवा सॅनिटायझर हातांना चोळावा. साबण हातांना चोळण्याचे आठ टप्पे आहेत.

1. तळहात ते तळहात

2. बोटांमधील बेचक्या

3. दोन्ही हातांच्या बाहेरील बाजू

4. अंगठ्यांच्या तळाची आतील-बाहेरील बाजू

5. बोटांची बाहेरील बाजू

6. नखे

7. मनगटे

8. शेवटी पुन्हा नळ सोडून, हाताला आलेला साबणाचा फेस आणि पूर्ण अंश पाण्याखाली निघून जाईपर्यंत धुवावेत.  

 

आरोग्य संपन्न होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणे म्हणजे आपल्या हाताची स्वच्छता राखणे त्यासाठी वारंवार हात धुण्याच निर्धार करा आणि आरोग्य संपन्न व्हा.

सद्यस्थितीत संपूर्ण जगामध्ये कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोविड-19 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हाताची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे व मास्कचा वापर करणे यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. हाताची स्वच्छता म्हणजे हात अशा प्रकारे धुवावे की जेणेकरुन हातावर संभाव्य पॅथोजेन्स (हानिकारक जंतू) बऱ्याच प्रमाणात कमी होतील. हाताची स्वच्छता राखण्यासाठी 40 सेकंद साबणाने हात धुवावे किंवा 70% अल्कोहोल असलेले हँडरब वापरावेत. 40 सेकंद साबण आणि पाण्याने हात सतत धुवा, विशेषत: सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यावर किंवा शिंकल्यावर किंवा खोकल्यावर न धुतलेल्या हातानी स्वत:च्या नाकाला, तोडांला व डोळयांना स्पर्श करु नका. जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य विभागाकडून आपणास हात धुण्याबाबत सांगितले जाते. खरे तर, हा साधा उपाय सर्दी, खोकला, फ्लू, स्वाइन फ्लू आणि आता कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी प्रामुख्यानं सांगितला जातो. विशेषतः श्वसनमार्गाला आणि पचनसंस्थांना बाधित करणाऱ्या व्हायरल आजारांना टाळायला हा रामबाण उपाय समजला जातो.

हात धुण्याबाबत काही मनोरंजक गोष्टी जागतिक सर्वेक्षणातून लक्षात आल्या आहेत. 'रिस्क अॅनॅलिसिस' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नियतकालिकाच्या 23 डिसेंबर 2019च्या अंकात त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यानुसार, 30टक्के व्यक्ती शौचाला जाऊन आल्यावर अजिबात हात धुत नाहीत. ज्या70 टक्के व्यक्ती हात धुतात, त्यातले निम्मे लोक केवळ पाण्यानं हात ओले करतात आणि पुसतात. केवळ 2 टक्के व्यक्तींनाच शास्त्रोक्त पद्धतीने हात कसे धुवावेत हे माहीत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना जगभरात हात कसे धुवावेत याचं प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना देण्यावर भर देत आहे.

 

जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये, ग्रामपंचायत स्तरावर, अंगणवाडी मध्ये हात धूण्याचे महत्व व प्रात्याक्षिक करवून घेण्याचे प्रयत्न दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविणेत येतात.

सर्वांनी विनंती  हात धुण्याला कमी लेखू नका, त्याला आपली सवय बनवा असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यान्नी केले आहे.

Comments