Samsung Galaxy M51 भारतात लाँच

 


दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी M सीरिजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Galaxy M51 हा स्मार्टफोन भारतात आणला आहे. मोठ्या बॅटरीमुळे या फोनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर तब्बल 7000एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला हा स्मार्टफोन आज लाँच झाला आहे. भारतीय बाजारात सॅमसंगचा हा फोन वनप्लस नॉर्डला टक्कर देऊ शकतो. इलेक्ट्रिक ब्लू और सेलेस्टियल ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. जाणून घेऊया Samsung Galaxy M51 ची किंमत आणि अन्य फीचर्सबाबत…

हा फोन कंपनीने 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये आणला आहे.  सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.7 इंचाचान ‘सुपर एमोलेड प्लस इन्फिनिटी-O’ डिस्प्ले आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर असलेल्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर असून यासोबत फास्ट ग्राफिक्ससाठी एड्रेनो 618 जीपीयू मिळेल. हा फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅमच्या पर्यायासह 128 जीबी स्टोरेज मेमरीसह येतो. फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M51 मध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅशसोबत 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तर एक 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर, एक 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि एक 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये SONY IMX616 सेन्सरसोबत 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

अँड्रॉइड 10 वर आधारित OneUI चा सपोर्ट असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये कंपनीने तब्बल 7000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. बॅटरीसाठी कंपनीकडून 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. हे 25W फास्ट चार्जर कंपनीकडून बॉक्स पॅकिंगमध्ये दिलं जात आहे. 115 मिनिटांमध्ये हा फोन 0 ते 100 टक्के चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4जी, ब्लूटूथ, जीपीएस आणि टाईप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल.

6जीबी रॅम +128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24 हजार 999 रुपये आणि 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 26 हजार 999 रुपये आहे. हा फोन 18 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर आणि सॅमसंग शॉपमधून खरेदी करता येईल.

Comments