'करण जोहरचं नाव घेतलं तरच...' ड्रग्ज प्रकरणात क्षितीज प्रसादचा NCB वर आरोप
सुशांत सिंह राजपूत केससंबंधित नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो कडून गेल्या आठवड्यात ड्रग्ज प्रकरणात चित्रपट निर्माते क्षितीज प्रसादला अटक करण्यात आली. क्षितीज प्रसादने एनसीबीवर गंभीर आरोप लावले आहेत. प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसादला ब्लॅकमेल केलं आणि त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला.ते पुढे म्हणाले की, क्षितीज प्रसादला चौकशीदरम्यान करण जोहर आणि त्यांचे टॉप एक्सीक्युटिव्ह यांना अडकविण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली.
वकील मानशिंदे यांनी प्रसादचा हवाला देत कोर्टात सांगितले की, 'NCB चे अधिकारी म्हणाले की, जर प्रसादने करण जोहर, सोमेल मिश्रा, राखी, अपूर्वा, नीरज वा राहिल यांचं नाव घेतलं तर ते त्याला सोडून देतील.' गेल्या आठवड्यात एनसीबीने क्षिजीतला अटक केली होती. प्रसादच्यावतीने त्याच्या वकिलाने सांगितले, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मला करण जोहर आणि त्यांच्या टीमवर ते ड्रग्ज घेतात असे खोटे आरोप लावण्यास सांगितले.
त्यांनी माझ्यावर खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला.मात्र तरीही मी त्यांचं ऐकलं नाही. मी टीम मधील सदस्यांना वैयक्तिक ओळखत नाही. आणि मी कोणावर खोटे आरोप लावू इच्छित नाही. या वक्तव्यात समीर वानखेडेचं नाव घेण्यात आलं आहे. मानेशिंदे यांनी सांगितले की, समीर वानखेडे यांनी क्षितीजला वाईट वागणूक दिली.
समीर वानखेडे क्षितीजला म्हणाले..जर तू ऐकलं नाही, तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. आणि वानखेडेंनी क्षितीजला आपल्या खुर्चीच्या जवळ जमिनीवर बसायला सांगितले.त्यांनी त्याच्या चेहऱ्याजवळ आपला शूज असलेला पाय नेला आणि म्हणाले की..तुझी खरी लायकी हीच आहे. वकिलांनी सांगितले की वानखेडे यांच्या अशा वागणुकीवर त्यावेळी तेथील दुसरे अधिकारी हसत होते. गेल्या आठवड्यात करण जोहरने क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनशी जोडलेला असलेल्या आरोपाचं खंडन केलं. करण जोहरने ट्विट करीत याबाबत माहिती दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा