लातूरमध्ये करोनाबाधितांची संख्या सात हजार पार
लातूर : लातूर जिल्ह्य़ातील आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या सात हजार ११९ वर पोहोचली असून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या पाच हजार ३९१ आहे, तर सध्या विविध रुग्णालयात उपचार घेणारे एकूण एक हजार ४७८ रुग्ण आहेत. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५० एवढी आहे. करोनाचा मृत्युदर हा देशाच्या मृत्युदराच्या दुप्पट आहे, तर तो महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्य़ात नव्याने १५० करोनाबाधितांची भर पडली. शहरातील मनपाच्या प्रतिजन चाचणी केंद्रात लक्षणे असणाऱ्यांसाठी चाचण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, चाचण्यांची संख्या अद्याप मर्यादितच आहे.

Comments
Post a Comment