धुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपवरच आंदोलन करायची वेळ
धुळे महापालिका प्रशासनाविरोधात चक्क सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली. प्रशासन नगरसेवकांना किंमत देत नाही, प्रशासनाचं आडमुठी धोरण, गलथान कारभार अशा विविध कारणांसाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केलं. तब्बल तीन तास नगरसेविका शीतल नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. माझे आरोप खोटे निघाल्यास मी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच फाशी घेईन, असा इशाराच शितल नवले यांनी प्रशासनाला दिले.
भ्रष्टाचारामुळे विकास कामांना वेळ मिळत नसल्याने नागरिकांचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप नगरसेवक शीतल नवले यांनी यावेळी केला.

Comments
Post a Comment