रत्नागिरीतील निवळी-रावणंगवाडी येथे माझे कुटूंब-माझी जबाबदारी अभियानाचा शुभारंभ


शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच माझे कुटुंब-माझी जबाबदारी निवळी-रावणंग वाडीमध्ये या मोहीमेत जिल्हापरिषद सदस्य परशुराम कदम, पं. स.सदस्य सौ. साक्षी रावणंग, सरपंच वेदिका रावणंग हे सहभागी झालेत. त्यांच्या सोबत वैधकीय अधिकारी  म्हणून अतिशय प्रामाणिक पणे काम करणारे डॉ.निमकर,केतकर सिस्टर,आशा,स्वयंसेवक  प्राथमिक आरोग्यकेंद्र हातखंबा आरोग्य कर्मचारी गोताड आणि गरुड हे होते माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ही मोहिम राबवताना कशापद्धतीने आरोग्य विभाग ग्रामीण भागात काम करत आहे,त्याना ही काही अडचण नाही ना याबाबत चर्चा करण्यात आली.

ग्रामस्थ ही त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत.असे आरोग्य कर्मचारी आणि आशा यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थाची त्यांच्या घरीच प्राथमिक आरोग्य तपासणी होत आहे आणि तशी ऑनलाईन नावासहित प्रत्येकाची नोंद ही केली जात आहे. त्यासाठी जिल्हापरिषद सदस्य यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे व महाविकास आघाडीचे आभार मानले.




Comments