ना. उदय सामंताना कोरोनाची लागण
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील दहा दिवसांपासून ते सेल्फ क्वारंटाईन असल्याने दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ना. उदय सामंत यांची परवा टेस्ट करण्यात आली होती व ती पॉझिटिव्ह आली आहे. सध्या प्रकृती ठणठणीत असून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज चालू आहे. पुढील आठवड्यात ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रुजू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Post a Comment