गानसम्राज्ञी लतादीदींच्या ९१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविकास आघाडी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेश यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या औचित्याने महाराष्ट्र विकास आघाडीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे निश्चीत केले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी राज्यात मुंबई येथे शासकिय संगीत महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीचे प्रमुख नेतृत्व व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत गानसम्राज्ञी लता दिदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करणार असल्याची माहीती नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment