रत्नागिरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या वतीने जनजागृती
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनजागृतीची आवश्यकता होती. शासनाने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग ठेवणे हे नियम अनिवार्य केले आहेत. मात्र जनतेमधून या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. जे विना मास्क फिरताना आढळून येतात त्यांना मास्क दिले जात आहेत.
चौका चौकात वाहनाद्वारे कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव, त्यापासून घ्यावयाची काळजी, शासनाचे नियम आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सोशल डीस्टं सिंग व मास्कचा वापर करावा रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी केले आहे.

Comments
Post a Comment