विकास फक्त पवारांच्या बारामतीतच होतोय, राष्ट्रवादीच्या आमदाराचा घरचा आहेर
'पुणे जिल्ह्यात विकास फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावात होत आहे', असं म्हणत राष्ट्रवादीच्या आमदारांने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शरद पवार यांच्या होम पिचवर त्यांच्याच पक्षाचे खेडचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते हे गेले काही दिवसांपासून थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत आहेत. आपण वेगळा विचार करण्याच्या सूचना व सूचक इशाराही त्यांनी दिला.
मोहिते सध्या आपल्याच नेत्यांच्या आणि सरकारच्या विरोधात बोलत आहेत. भामा आसखेड धरणाच्या पाण्याबाबत ते आक्रमक झाले आहे. भीमाशंकर परिसर देवस्थान विकास यावरून ते दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करत आहे.जिल्ह्यातील फक्त दोन तालुक्यातच विकास होत आहे असेही त्यांचंच मत आहे. विशेष म्हणजे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तीन पक्षांचे एकत्र सरकार स्थापन झाल्यामुळे एकाच वेळी खातेवाटप करण्यात आले होते. त्यामुळे अनेक इच्छुक हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाले होते. खेड तालुक्याला मंत्रिपद कधीच मिळालं नाही.
त्यामुळे दिलीप मोहितेही नाराज झाले.'विकास फक्त अजित पवार यांच्या बारामतीत आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातच घडत आहे, असं म्हणून त्यांनी पक्षाच्या नेत्यांवरच टीका केली आहे.याआधीही दिलीप मोहिते यांनी सोशल मीडिया आणि विविध वृत्तपत्रात त्यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी डॅमेज करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिलीप मोहिते यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काय कारवाई करते हे पाहण्याचे ठरणार आहे.

Comments
Post a Comment