राजापूर ग्रामीण रुग्णालयाला नविन दोन वैद्यकीय अधिक्षकांची नियुक्ती करावी
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.जगन गारुडी हे त्यांच्या आईचा अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते सुट्टीवर गेले आहेत. राजापूर ग्रामिण रुग्णालय हे राजापूर तालुक्यातील केंद्रस्थानी असल्यामूळे या रुग्णालयामध्ये तालुक्यातील शवविच्छेदन, प्रसूती रुग्ण, सर्पदंश रुग्ण आदी अत्यावश्यक उपचारासाठी येणारे रुग्ण दाखल होत असतात.
सध्याच्या कालावधीत या रुग्णालयामध्ये मी स्वतः एकटाच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून मला दररोज २४ तास काम करणे शक्य नाही. त्यामुळे या रुग्णालयात नविन आणखी दोन डॉक्टर द्यावेत अशी मागणी वैद्यकीय अधिक्षक डॉ.राम मेस्री यांनी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे.

Comments
Post a Comment