रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांना मच्छीमारांची काळजी नाही, त्यांनी एकदाही बैठक घेतली नाही


रत्नागिरी जिल्ह्यात मच्छीमारांच्या अनेक समस्या आहेत. मात्र या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी एकही बैठक बोलावली नाही. अनिल परब जिल्ह्यात येतच नाही. मग असे मुंबईचे पालकमंत्री कशाला हवेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री करावे. कोकणात परराज्यातील मच्छीमारी नौका घुसखोरी करत असून त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. त्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने परराज्यातील मच्छीमारी नौकांवर महाराष्ट्राच्या हद्दीत येण्यास बंदी करावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा पर्ससीन नेट मच्छिमार संघटनेने केली आहे.

नुकतीच रत्नागिरी जिल्हा पर्ससीन नेट मच्छिमार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रतिक मोंडकर, नुराशेठ पटेल, विकास धाडस, विजय खेडेकर, जावेद होड़ेकर, जितू बिर्जे, मुकेश बिर्जे, शाहिद मिरकर, हनीफ मालदर, नासिर वाघू आदी उपस्थि होते. यावेळी विकास धाडस म्हणाले की जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न किरण सामंत सोडवू शकतात. तेच आमच्या पाठीशी असतात. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही राजकीय पक्षाला मच्छीमारान्ची काळजी नाही अशा शब्दात तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Comments