निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या खेड, दापोली, मंडणगड भागातील शाळा व आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष


खेड, दापोली, मंडणगड परिसरातील निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा आणि अनेक आरोग्य उपकेंद्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने केवळ पंचनामे केलेले आहेत परंतु कोणत्याही प्रकारची मदत केली नाही . यामुळे सदर इमारती नादुरुस्त झाल्या आहेत.

सदर इमारतींमध्ये यापुढे शाळा भरवणे हे गैरसोयीचे आणि धोकादायक झाले आहे,तसेच या कोरोना साथीच्या रोगात आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक झाल्यामुळे तेथे रुग्णांना सेवा देणे अडचणीचे झाले आहे . तरी या निवेदनाद्वारे पालकमंत्री अनिल परब यांनी या परिस्थिती कडे लक्ष वेधुन लवकरात लवकर सदर कामाला निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे,अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .

सदर निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस नितीन म्हामुणकर,तालुका अध्यक्ष अनिलजी रटाटे, मंडणगड नगराध्यक्ष आरती ताई तलार,शहराध्यक्ष वैभव कोकाटे,युवक सरचिटणीस हरेशजी मर्चंडे,नगरसेवक दिनेश लेंडे,नगरसेवक सचिन बेर्डे,म्हाप्रळ गणाचे अध्यक्ष अनंत शिगवण,सर्फराज भाई चिपोळकर ,इर्शाद देवळेकर , सुरज पाडावे,संजय राणे , विष्णु सुगदरे,नितीन पाडावे , समीर म्हामुणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments