रत्नागिरी जिल्ह्यातुन येणाऱ्या रुग्णांच्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट

 


रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत असतानाच आय.टी.आय. येथील कोव्हीड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव यांनी हे रुग्णालय बंद केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू असा ईशारा प्रशासनाला दिला होता. 

त्या धर्तीवर आज युवक काँग्रेस पदाधिकारी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव बंटी वणजू यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांची भेट घेऊन ते बंद करण्यात येणार नाही याची ग्वाही घेतानाच तेथील विविध समस्यांचाही आढावा घेतला. उद्यमनगर येथील नवीन महिला रुग्णालयामध्ये जिल्ह्यातून  रुग्णांन सोबत येणाऱ्या नातेवाईकांन साठी तळ मजल्यावरील हॉल उपलब्ध करण्याबाबत लक्ष वेधले आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून जे जे लागेल ते

 राष्ट्रवादी काँग्रेस चे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आ.श्री शेखर निकम,  जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ लिमयें, कुमारजी शेट्ये, बशीरभाई मुर्तुझा, तालुकाध्यक्ष नाना मयेकर, जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद कीर, महिला तालुकाध्यक्ष शमीम ताई, शहर अध्यक्ष निलेश भोसले, महिला शहर अध्यक्ष नेहालीताई नागवेकर, रामभाऊ गराटे यांच्या माध्यमातून मिळवूनच देऊ हा विश्वास त्यांनी दिला. 

त्या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू, युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष श्री मंदार नैकर, विध्यार्थी चे ऍड साईजीत शिवलकर, पप्पु तोडणकर,रुपेश आडिवरेकर,सुरज शेट्ये, संदीप रहाटे,संकेत देसाई आदी उपस्थित होते.

Comments