रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावातील स्माईल गृपच्या तरुणांनी श्रमदानातून भरले रस्त्यावरचे खड्डे
रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ-बौद्धवाडी ते लाजूळ मुख्य रस्ता या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याची भिती होती. या मार्गावरुन वाहतूक करणे जिकरीचे ठरत होते. या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावेत अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून रस्त्यावर खड्डे भरण्यात आले नाहित. यावर उपाय म्हणून लाजूळ गावातील स्माईल ग्रुपचे तरुण एकत्र येऊन श्रमदानातून या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे निश्चीत केले.
नुकतेच हे खड्डे भरण्याचे काम पार पडले. स्माईल ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी गावात एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. याकामी सुभाष सावंत, प्रविण सावंत, प्रफुल्ल सावंत, प्रतिक सावंत, धनंजय सावंत, तुषार सावंत, सुजित सावंत, अमोल सावंत, अजेश सावंत, तेजस सावंत, दीपेश सावंत, मनिष सावंत, प्रणय सावंत, स्वरुप सावंत आदीनी विशेष परिश्रम घेतले.



Comments
Post a Comment