डहाणू येथे व्यावसायिक स्नूकर स्पर्धा संपन्न

 


डहाणू वडकुन येथील बाबा स्नूकर झोन तर्फे नुकतीच स्नूकर प्रीमियम लीग स्पर्धा पार पडली. या ओपन स्नूकर स्पर्धेत एकूण 18 व्यावसायिक खेळाडूंनी भाग घेतला होता. अत्यंत नियोजनबध्द रित्या पार पडलेल्या  या स्पर्धेत मालक जितू राठोड यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.त्यांच्या टीम मध्ये आसाद शेख हा दुबई मध्ये स्नूकर स्पर्धा गाजवणारा खेळाडू होता.त्याला अमित शर्मा,सागर मंडालिया यांनी जबरदस्त साथ दिली. डहाणू,पालघर,बोईसर,वापी,वलसाड येथील व्यावसायिक व निष्णात खेळाडूंनी या स्पर्धेस हजेरी लावली होती.

Comments