पालघर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी मुख्य चुरस रुफी भुरे व मोईज शेख यांच्यातच

 


2024 च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पालघर जिल्ह्यातील काँग्रेस मधील मरगळ दूर करण्याचे प्रदेश श्रेष्ठींनी ठरवलेले दिसत आहे, त्या दृष्टीनेच जिल्हाध्यक्ष बदल करण्याचे संकेत दिसून येत आहेत.विद्यमान अध्यक्ष आपल्या दीड वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचे पक्षश्रेष्ठींना दिसून आल्यानेच ही परिस्थिती पालघरमध्ये निर्माण झाली असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण वेळ देणारा व जिल्हा पिंजून काढणारा पूर्ण वेळ जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाला हवा आहे व ही काळाची गरज आहे.दुर्दैवाने आज तरी पक्षात असा कोणी नेता दिसत नाही.पार्ट टाईम नेत्यांची पक्षात मांदियाळी आहे.

500 च्या वर ग्रामपंचायती असलेल्या या जिल्ह्यात बोटावर मोजता येणाऱ्या ग्रामपंचायती काँग्रेस च्या ताब्यात आहेत.एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला आज ध्वस्त होताना दिसून येत आहे.अश्यावेळी खंबीर पणें काँग्रेस चे नेतृत्व कोण करणार व हा कारभार कोण पुढे चालवणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जग आज संगणकीकरणाकडे जात असताना, उच्चशिक्षित व सर्व माहिती तंत्र अवगत असलेली व्यक्ती,वरिष्ठांशी जुळवून घेणारी व्यक्ती पालघर जिल्हाध्यक्ष या पदावर बसणे गरजेचे आहे व या दृषटीकोनातून रफी भुरे व मोईज शेख ही दोन नावे आजच्या घडीला चर्चेत आहेत. मोईज शेख यांनी जवळ जवळ 25वर्षाहून अधिक काळ काँग्रेस मध्ये व्यतीत केला असून शिंगडा साहेबांचे खंदे समर्थक म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे.स्पष्ट वक्तेपणा, संपूर्ण जिल्ह्याची ओळख, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असलेली जवळीक,पक्ष नेत्यांशी असलेले आपुलकीचे संबंध ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

रफी भुरे यांच्या नावाला काही मोजक्या नेत्यांचा पाठींबा असला तरीही जिल्हा पिंजून काढणे ही काही छोटी बाब नव्हे त्याचप्रमाणे  जिल्ह्यात सर्वांशी व्यवस्थित सुसंवाद साधला गेला पाहिजे.या सर्व बाबी जर जमून आल्या तर जिल्हाध्यक्ष पदाची माळ रफी भुरे यांच्या गळ्यात पडू शकते.

आजच्या घडीला, बाकीचे 3 दावेदार प्रभावहीन दिसून येत असल्याने पालघर जिल्हाध्यक्ष पद रफी भुरे किंवा मोइज शेख यानाच मिळणार हे जवळ जवळ निश्चित होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

Comments